कारगिल युद्धातील हिरो त्सेवांग मुरोप रस्ते अपघातात 'शहीद', कॉर्प्स कमांडरने व्यक्त केला शोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 14:47 IST2023-04-02T14:46:28+5:302023-04-02T14:47:36+5:30
Tsewang Murop death : कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर आणि वीर चक्राने सन्मानित असेलेले त्सेवांग मुरोप हे रस्ते अपघातात शहीद झाले आहेत.

कारगिल युद्धातील हिरो त्सेवांग मुरोप रस्ते अपघातात 'शहीद', कॉर्प्स कमांडरने व्यक्त केला शोक
नवी दिल्ली : कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर आणि वीर चक्राने सन्मानित असेलेले त्सेवांग मुरोप हे रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. लडाखमधील लेह येथे झालेल्या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. फायर ॲंड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी त्यांच्या घरी जाऊन लष्कराच्या वतीने शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मुरोप यांचे वडील नायब सुभेदार चेरींग मुरोप अशोक चक्र (सेवानिवृत्त) आणि इतर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी लष्कर उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर त्सेवांग मुरोप यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वीर चक्राने सन्मानित असलेल्या मुरोप यांचे काल रात्री लेहजवळ निधन झाले.
Kargil war hero Subedar Major Tsewang Murop, Vir Chakra lost his life in a road accident last night near Leh. pic.twitter.com/653DjBc1C4
— ANI (@ANI) April 2, 2023
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"