शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 21:09 IST

Kapil Sibal on BMC Election : 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते.'

Kapil Sibal on BMC Election : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भारतीय जनता पक्षासह तिच्या मित्रपक्षांवर जोरदार टीका केली आहे. 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते,' असा गंभीर आरोप सिब्बल यांनी केला.

बीएमसी निकाल काय सांगतात?

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवत 89 जागांवर विजय मिळवला. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केवळ 3 जागा मिळवल्या. या पार्श्वभूमीवर सिब्बल म्हणाले, 'या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांचे नुकसान झाले, फायदा झाला तो फक्त भाजपलाच.  संधीसाधू राजकारण जनता ओळखते. यापासून विरोधकांनी धडा घ्यायला हवा.'

भाजपची रणनीती : आधी साथ, नंतर वनवास

सिबल पुढे म्हणतात, 'ज्या राज्यांत भाजपला एकहाती विजयाची खात्री नसते, तिथे ते लहान पक्षांशी तडजोड करतात. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्याच पक्षांना हळूहळू बाजुला ढकलले जाते. जिथे काँग्रेसशी थेट लढत आहे, जसे उत्तर प्रदेश, तिथे भाजप कुणाशीही तडजोड करत नाही. आता हीच खेळी तामिळनाडूतही खेळली जात आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजप अडचणीत आहे.'

...तर तुमचे भविष्य संपते

कपिल सिब्बल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना म्हटले की, 'निकालानंतर शिंदेंना आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवावे लागत आहे. याचे कारण म्हणजे, भाजप फोडाफोडी करते, हे त्यांनाही माहीत आहे. अजित पवार कोणत्याही एका बाजूला ठाम राहिले नाहीत. त्यामुळे ते फक्त तीन जागांवर अडकले. या निवडणुकीत त्यांचेच नुकसान झाले. त्यांनी स्वतःचे राजकीय भविष्य धोक्यात घातले. भाजपसोबत तडजोड केली तर तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, सत्ता मिळू शकते, पण तुमचे भविष्य संपते,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sibal slams BJP's tactics in Maharashtra's municipal election results.

Web Summary : Kapil Sibal criticizes BJP for using smaller parties for power, then marginalizing them. He warns Eknath Shinde and Ajit Pawar about BJP's tactics, suggesting they risk their political future by aligning with BJP, despite potential short-term gains.
टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस