शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

२०२९ ची निवडणूक जिंकण्यासाठीच सरकारचे 'महिला आरक्षण' कार्ड, कपिल सिबल यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:12 IST

Women's Reservation: महिला आरक्षण कायद्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींवर राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी तीव्र टीका केली आहे.

नवी दिल्ली - महिला आरक्षण कायद्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींवर राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी तीव्र टीका केली आहे. हे विधेयक केवळ २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या राजकीय उद्देशाने आणले जात असून, विरोधकांनी या 'राजकीय खेळी'ला कडाडून विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सिबल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, भाजप राजकीय फायद्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. जर सरकारला खरोखरच महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांनी सध्याच्या ५४३ जागांवरच हे आरक्षण लागू करावे. मात्र, २०२६ नंतरची जनगणना व त्यानंतरचे मतदारसंघांचे 'सीमांकन' होईपर्यंत हे आरक्षण लागू होणार नाही, अशी अट पूर्वीच घालण्यात आली होती. आता सरकार त्यात बदल करू पाहत आहे, पण तो नेमका काय आहे हे स्पष्ट केले जात नाही.

हा भाजपचा डाव मतदारसंघांच्या सीमांकनामुळे भाजपला उत्तर भारतात मोठा राजकीय फायदा होणार असल्याचे गणितही सिबल यांनी मांडले. हे भारताच्या संघराज्य रचनेला तडा देणारे असून, सीमांकन आयोग आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.विधानसभा निवडणुका सुरू असताना  संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या वेळेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तृणमूल व इतर विरोधी पक्षांचे खासदार प्रचारात व्यग्र असताना हे अधिवेशन बोलावणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न.

English
हिंदी सारांश
Web Title : Govt's Women's Reservation Card Aimed at 2029 Election: Kapil Sibal

Web Summary : Kapil Sibal criticizes the women's reservation bill, alleging it's a political ploy to win the 2029 election. He claims BJP only acts for political gain and aims to exploit constituency delimitation for advantage, undermining federalism.
टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलWomen Reservationमहिला आरक्षण