शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कारनं तरुणीला फरफटत नेल्याच्या घटनेची थेट अमित शाहांनी घेतली दखल; दिले महत्वाचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 21:01 IST

दिल्लीच्या कंझावालामध्ये एका तरुणीला कारनं फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीच्या कंझावालामध्ये एका तरुणीला कारनं फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. ज्या भीषणतेनं तरुणीला कारनं अनेक किलोमीटर फरफटत नेलं ते पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला आहे. आता या प्रकरणाची दखल थेट गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. शाह यांनी दिल्ली पोलिसांनी स्पष्ट सूचना देत संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं मागवला आहे. शाह यांच्यावतीनं वरिष्ठ अधिकारी शलिनी सिंह यांना निर्देश देण्यात आलेत की तातडीनं रिपोर्ट तयार केला जावा आणि योग्य ती कारवाई केली जावी. 

दिल्लीच्या कंझावालामध्ये रविवारी एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्यानं तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगानं कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १० ते १२ किमीपर्यंत फरफटत नेलं. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी मृतदेह प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता काही अंतरावर तिची स्कूटर देखील आढळून आली. जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. स्कूटीच्या नंबरप्लेटच्या मदतीनं तरुणीची ओळख पटवण्यात आली. 

आरोपींना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी जातीनं यात लक्ष घातलं आहे. त्यांनी पोलिसांना सविस्तर अहवाल देण्यास सांगितलं आहे. 

पोलिसांनी काय सांगितलं?दिल्ली पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दीपक खन्ना नावाचा आरोपी कार चालवत होता. जो ग्रामीण सेवा विभागात कार्यरत आहे. याशिवाय कारमध्ये त्याच्यासोबत अमित खन्ना, कृष्ण, मनोज आणि मिथुन हे इतर चार जण होते. सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरवांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेची टाइमलाइन तयार करण्यात येणार आहे. त्याच आधारावर आरोपी नेमकं कुठून आले आणि कुठे जात होते याची माहिती मिळू शकणार आहे. पोलिसांनी सांगितलं की तरुणीला फरफटत नेत असताना ती कारमध्ये अडकली. १० ते १२ किमीपर्यंत ती फरफटत नेलं गेलं. मृतदेहाचा पोस्टमार्टम अहवाल उद्या प्राप्त होईल, असंही पोलिसांनी सांगितलं. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहdelhiदिल्ली