Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:53 IST2025-05-07T13:51:44+5:302025-05-07T13:53:17+5:30

Kangana Ranaut And Operation Sindoor : भाजपाची खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Kangana Ranaut reaction on operation sindoor on pakistan said modi ne inko bata diya | Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हवाई हल्ले केले. या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. या ऑपरेशनमुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. अखेर न्याय झाला असं अनेक जण म्हणत आहेत. भाजपाची खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तीन स्टोरी शेअर केल्या आहेत. 

कंगना राणौतने भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. तसेच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही शेअर केला आहे. "ते म्हणाले की, हे मोदींना सांगा. आणि आता मोदींनी त्यांना दाखवून दिलं. ऑपरेशन सिंदूर" असं एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. "जे आपलं रक्षण करतात, देव त्यांचं रक्षण करो. मी सैन्य दलाच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी शुभेच्छा देते. ऑपरेशन सिंदूर " असं दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

एका पोस्टमध्ये कंगनाने पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर केला आणि त्यावर ओळख, ट्रॅक आणि शिक्षा असं म्हटलं आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी पतींना त्यांच्या पत्नींसमोर मारलं आणि त्यांना मोदींना जाऊन सांगा असं म्हटलं होतं. 

अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने मिसाईल अटॅक करून दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं. या यामध्ये जैश आणि हिजबुल सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय आणि लपण्याची ठिकाणे देखील समाविष्ट आहेत. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, काल रात्री हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. 

Web Title: Kangana Ranaut reaction on operation sindoor on pakistan said modi ne inko bata diya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.