Kangana Ranaut: "चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:44 IST2025-04-10T11:44:32+5:302025-04-10T11:44:51+5:30
Kangana Praises PM Modi Leadership: कंगनाने आता एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं.

Kangana Ranaut: "चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची खासदार कंगना राणौत नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. कंगनाने आता एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं. "चंद्रावर डाग आहे पण पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही" असं म्हटलं आहे. यासोबतच तिने काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेक घोटाळे झाले, ज्यात 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा आणि चारा घोटाळा यांचा समावेश आहे असंही म्हटलं.
"पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही"
हिमाचल प्रदेशातील सुंदरनगरच्या जारोल विधानसभा मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना कंगना म्हणाली की, "भाजपा आणि आरएसएसची विचारसरणी सनातन, राष्ट्रवाद, वसुधैव कुटुंबकम यांचं पालन करते, ज्याचं आपणही बऱ्याच काळापासून पालन करत आहोत... २०१४ पूर्वी, बरेच घोटाळे होत होते - 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा... पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही. चंद्रावर डाग आहे. पण मोदींवर एकही डाग नाही."
पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी: कंगना
कंगनाने काँग्रेसवर साधला निशाणा
कंगनाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं खूप कौतुक केलं, तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारवर राज्याला वाईट स्थितीत आणल्याचा आरोप केला. राज्यातील 'समोसा' चौकशीच्या वादावरून कंगनाने निशाणा साधला आहे. "संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी आणि भगव्या रंगाची लाट आहे पण हिमाचल प्रदेशची स्थिती पाहून वाईट वाटतं. त्यांच्या एजन्सी समोशाची चौकशी करत आहेत."
"राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी"
"जे घडत आहे त्याची आम्हाला लाज वाटते. आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी आपली आहे. मी म्हणेन की ते एका प्रकारचे लांडगे आहेत. आपल्याला आपल्या राज्याला त्यांच्यापासून मुक्त करावं लागेल" असं कंगना राणौतने म्हटलं आहे. याआधी अनेकदा कंगनाच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.