शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

कामठी... अधिवेशन

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

ग्रामीण विकासासाठी पत्रकारांचे मोलाचे योगदान

ग्रामीण विकासासाठी पत्रकारांचे मोलाचे योगदान
कृपाल तुमाने : कामठी येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन
कामठी : ग्रामीण भागातील विकासासाठी पत्रकाराचे मोलाचे योगदान असते. ग्रामीण पत्रकार हे खेड्यापाड्यातील समस्या व अन्यायांना प्रामाणिकपणे वाचा फोडतात, असे मत खा. कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्थानिक दिवाण मंदिरात आयोजित द्विवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे कामठी येथे रविवारी द्विवार्षिक अधिवेशन पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख, स्वागताध्यक्ष तथा कामठी पालिकेचे उपाध्यक्ष रणजित सफेलकर, नगरसेविका मीना सफेलकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, ॲड. अनिल महात्मे, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णकुमार मिश्रा, कार्याध्यक्ष दिलीप हिवरकर, रमेश बावीस्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खा. कृपाल तुमाने, आ. डॉ. आशिष जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. खा. तुमाने म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांना विविध समस्यांना तोंड देऊन पत्रकारिता करावी लागते. ग्रामीण पत्रकार केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवितात. ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आपण प्राथमिकतेने सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व पाहुण्यांचा न.प. उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप हिवरकर यांनी केले. संचालन प्रदीप घुमडवार यांनी तर आभार सुदाम राखडे यांनी मानले. याप्रसंगी सन २०१४-१६ दरम्यान द्विवार्षिक जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून दिलीप हिवरकर, कार्याध्यक्षपदी प्रदीप घुमडवार तर सरचिटणीसपदी योगेश कोरडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. अनिल महात्मे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पत्रकार संदीप कामळे, उज्ज्वल रायबोले, नितीन रावेकर, सुनील चलपे, श्यामलाल शर्मा, वाजीद अली, गजानन बोरकर, नंदू कोल्हे, राजेश शर्मा, दुबे आदींनी स्वागत केले. अधिवेशनाला जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)