शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कामठी... खत

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

रासायनिक खतांचा काळाबाजार

रासायनिक खतांचा काळाबाजार
महालगाव परिसरातील शेतकरी त्रस्त : पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
कामठी : तालुक्यातील नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव येथील कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची शेतकऱ्यांनी ओरड आहे. यामुळे महालगाव व परिसरातील शेतकरी त्रस्त असून याबाबत त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
महालगाव येथील एका कृषी सेवा केंद्रातून विविध प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशक औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अश्विन इटनकर (रा. महालगाव, ता. कामठी) या शेतकऱ्याने १५ जानेवारीला युरिया रासायनिक खताची एक बॅग सदर कृषी सेवा केंद्र दुकानातून खरेदी केली. यात शेतकऱ्याने युरियाच्या एका बॅगेसाठी ३२० रुपये दुकानदारास दिले. परंतु सदर कृषी सेवा केंद्र मालकाने शेतकऱ्यास २९८ रुपयांची पावती दिली. शिवाय, दुकानदाराने शेतकऱ्यास पक्के बिल न देता डिलवरी मेमोची साधी पावती दिली.
येथील कृषी सेवा केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना पक्के बिल न देता नेहमी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत असल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांची खरेदी केल्यानंतर एकाही शेतकऱ्यास मुख्य बिलाची प्रत न देता डिलवरी मेमोची पावती दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुकानावरील फलकांवर खतांच्या किमंतीचे दर, उपलब्ध साठा लावला जात नाही. कृषी सेवा केंद्रधारक अनेक दिवसांपासून रासायनिक खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी २७ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी व मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे महालगावचे माजी सरपंच प्रकाश इटनकर यांच्या नेतृर्त्वात शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. खतांच्या काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्र दुकानदारांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश इटनकर, धनराज खांडेकर, हिरामण काटवले, कोठीराम ठाकरे, सुकराम मुळे, भोजराज मेश्राम, सुरेश शिंघाडे, अश्विन इटनकर आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)