Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 21:15 IST2025-05-27T21:11:30+5:302025-05-27T21:15:45+5:30
Jyoti Malhotra News: युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत असून, तिच्याबद्दल नवीन माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. ज्योती चार जणांच्या संपर्कात होती, ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे एजंट होते.

Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
Jyoti Malhotra Latest Update: युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी जेव्हा अटक केली, त्यानंतर खळबळ माजली. पाकिस्तानी दूतावासातील व्यक्तीच्या संपर्कात आलेली ज्योती नंतर थेट आयएसआयच्या एजंटसोबत बोलू लागली. तिच्याबद्दल आता नवीन माहिती तपासातून समोर आली आहे. ज्योती ज्या चार जणांच्या संपर्कात होती, ते आयएसआयचे एजंट असल्याचे आधीपासून माहिती होते, असे पोलिसांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिंदुस्थान टाइम्सने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार ज्योती मल्होत्राच्या तीन मोबाईलमधून तब्बल १२ टीबी डेटा मिळाला आहे. यात तिने चार पाकिस्तानी एजंटसोबत केलेले चॅटिंग, कॉल्स, व्हिडीओ फुटेज आणि आर्थिक व्यवहाराची माहिती आहे.
ज्योती थेट आयएसआय एजंटच्या संपर्कात
अधिकाऱ्याने सांगितले की, हे चार जण आयएसआयचे एजंट असल्याची पूर्ण कल्पना होती. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार ती थेट त्यांच्याच संपर्कात होती. त्यामुळे तिला पाकिस्तान दौऱ्यात विशेष आदरातिथ्य मिळालं होतं.
ज्योती ज्यांच्या संपर्कात होती, ते चौघे कोण?
आतापर्यंतच्या तपास आणि चौकशीतून आयएसआयच्या काही एजंटची नावे नावे समोर आलेली आहे. ते आयएसआय गुप्तचर संस्थेत मोठ्या पदावर किंवा पाकिस्तानी लष्करातील रँक अधिकारी आहेत.
वाचा >>'२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली'
ज्यांची नावे या तपासातून समोर आली आहेत, त्यात एक नाव दानिशचे आहे. त्याचबरोबर अहसान अली, शाहीद हेही आयएसआयचे एजंट असल्याचे म्हटले गेले आहे.