शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती मुद्यावरील कोंडी फुटली

By admin | Updated: December 9, 2014 01:47 IST

सर्वप्रथम विरोधकांनी या मुद्यावर साध्वींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर काहीशी मवाळ भूमिका घेत, राज्यसभेत असा प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधकांनी केली होती़

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्यावरील संसदेतील आठवडाभरापासूनची कोंडी सोमवारी फुटली़ संसदेच्या सर्व सदस्यांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सार्वजनिक विधाने करताना कुठल्याही स्थितीत संयम बाळगावा, अशा आशयाच्या राज्यसभा सभापतींच्या प्रस्तावानंतर या मुद्यावरील पेचप्रसंग संपला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज सुरळीत सुरू झाल़े
सर्वप्रथम विरोधकांनी या मुद्यावर साध्वींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर काहीशी मवाळ भूमिका घेत, राज्यसभेत असा प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधकांनी केली होती़
 सभापती मोहंमद हमीद अन्सारी यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांच्या सहमतीने आलेला हा प्रस्ताव राज्यसभेत वाचून दाखवला़  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबरला सभागृहात दिलेले स्पष्टीकरण ध्यानात घेत, सर्व खासदार, मंत्री आणि नेत्यांनी सार्वजनिक विधाने करताना, संयम आणि शिष्टाचार पाळावा़ कुठल्याही स्थितीत सार्वजनिक विधाने करताना शिष्टाचार पाळला जायला हवा, असे या प्रस्तावात म्हटले आह़े या प्रस्तावानंतर राज्यसभेतील कोंडी फुटली आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाल़े
लोकसभेत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, सपा, राजद आणि अन्य पक्षांनी कामकाजात भाग घेतला़ सरकारनेही सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल विरोधकांचे आभार मानल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)