शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पीएमओत ज्युनिअर मिश्रांची ‘वट’

By admin | Updated: July 29, 2014 02:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त सचिव डॉ. पी.के. मिश्रा (ज्युनिअर मिश्रा )अलीकडेच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालयात(पीएमओ) सशक्त बनले आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त सचिव डॉ. पी.के. मिश्रा (ज्युनिअर मिश्रा )अलीकडेच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालयात(पीएमओ) सशक्त बनले आहेत.प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचे अधिकार कमी करण्यात आले असून गुजरातहून आलेले ज्युनिअर मिश्रा पीएमओमध्ये नवे शक्तिकेंद्र बनले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी लोकमतला माहिती देताना सांगितले. पायाभूत क्षेत्र आणि विकासासंबंधी सर्व प्रकरणे नृपेंद्र मिश्राच हाताळणार असून ते विविध मंत्रालये आणि विभाग तसेच राज्य सरकारे आणि विदेशी सरकारांशी समन्वय राखण्याचे कामही पाहतील. ते यंत्रणा सुधारण्यासह ऊर्जा क्षेत्रावर भर देतील.दुसरीकडे डॉ. पी.के. मिश्रा यांच्याकडे मंत्रिमंडळ समिती स्तरावरील सर्व नियुक्त्या, मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकींना हजर राहणे, मंत्रालयाच्या कामांमधील समन्वय, मंत्रिमंडळाच्या बैठकींच्या अजेंड्याचे दस्तऐवज तयार करणे, थेट पंतप्रधानांच्या अखत्यारितील येणाऱ्या सर्व मंत्रालयाशी संबंधित कामकाजासह प्रशासनाची जबाबदारी अशी महत्त्वपूर्ण कामे असतील. त्यांना सचिवांच्या बैठका बोलावण्याचा अधिकारही बहाल करण्यात आला आहे. ट्रायमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे कायद्यानुसार कोणतीही जबाबदारी सोपविता आली नसती मात्र त्यांची नियुक्ती नियमित करण्यासाठी मोदींनी राष्ट्रपतींना वटहुकूम जारी करायला भाग पाडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते, राजकीय वर्तुळात हा वादाचा विषयही ठरला. तथापि वटहुकूम जारी केल्यानंतर मोदींनी पीएमओमध्ये अतिरिक्त सचिव हे नवे पद तयार केले. या जागेवर त्यांनी गुजरातमधील निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. पी.के.मिश्रा यांना आणले. डॉ.मिश्रा यांनी गुजरातमध्ये मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. नव्या व्यवस्थेत डॉ. मिश्रा यांच्याकडे सूत्रे एकवटली आहेत. सामान्यपणे पंतप्रधानांचे प्रधान सचिव हेच पॉवरफुल मानले जातात. देशभरातील सर्व अधिकारी त्यांच्याकडेच अहवाल सोपवित असतात. ते पंतप्रधानांचे कान आणि डोळे म्हणून काम करीत असतात असे मानले जाते.