१० जूनचा अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द; PM मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 06:31 IST2023-06-04T06:30:28+5:302023-06-04T06:31:04+5:30

२० जूनच्या सुमारास मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

june 10 amit shah mumbai visit cancelled discussion about the venue of pm modi meeting starts | १० जूनचा अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द; PM मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची चर्चा सुरू

१० जूनचा अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द; PM मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची चर्चा सुरू

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा १० जूनचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. आता ते पुणे किंवा छत्रपती संभाजीनगरपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाणार आहेत. 

भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क अभियानांतर्गत अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही महाराष्ट्रात एक जाहीर सभा होणार आहे. त्याची तारीख व ठिकाणाबाबत चर्चा सुरू आहे. २० जूनच्या सुमारास मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीचे कारण शोधणार 

-  महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सरचिटणीस सी. टी. रवी यांनी सांगितले की, मी स्वत: पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहे. 

-  त्यांचे भाषण मी पाहिले आहे. पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या नाराजीचे कारण शोधणार आहे.

 

Web Title: june 10 amit shah mumbai visit cancelled discussion about the venue of pm modi meeting starts