"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:18 IST2025-08-20T12:16:54+5:302025-08-20T12:18:02+5:30
व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे की, “राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्याचे रुपांतर एका पीआर संकटात झाले आहे...

"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यानी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मत चोरीच्या आरोपांवरून खिल्ली उडवली आहे. जेपी नड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ रिपोस्ट करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली.
जेपी नड्डा यांनी व्हिडिओ केला रिपोस्ट -
जेपी नड्डा यांनी 'एक्स'वर रीपोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदान अधिकार यात्रेचा एक भाग दाखवण्यात आला आहे. यात एक महिला, बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत तिच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे वगळल्यासंदर्भात तक्रार करताना दिसत आहे. मात्र, याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात, हीच महिला सागंत आहे की, तिला मतदान अधिकार यात्रेदरम्यान राहुल गांधींसमोर जाऊन हे बोलण्यास सांगण्यात आले होते.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उडवली राहुल गांधींची खिल्ली -
व्हिडिओ रिपोस्ट करत नड्डा यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. त्यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शन देतांना, “खडा हूं आज भी वहीं... जहां मेरा झूठ पकडाया, सच सामने आया और मैंने अपना मजाक बनवाया... खडा हूं आज भी वहीं,” असे लिहिले आहे.
खड़ा हूँ आज भी वहीं… जहाँ मेरा झूठ पकड़ाया, सच सामने आया, और मैंने अपना मज़ाक बनवाया… खड़ा हूँ आज भी वहीं। https://t.co/Ihdl77pR97
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 19, 2025
व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये काय?
तसेच, व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे की, “राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्याचे रुपांतर एका पीआर संकटात झाले आहे. आधी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सर्व दाव्यांसंदर्भात पुरावे सादर करण्यासा 7 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे आणि आता लोकच त्यांना सर्व बाजूंनी उघडे पाडत आहे.
"कॅप्शनमध्ये पुढे म्हटले आहे, "हा एक स्क्रीप्टेड पीआर होता. यात्रेदरम्यान आम्हाला मत चोरीसंदर्भात सांगण्यात आले होते. मात्र, आमची नावे मतदार यादीत आहेत. राहुल गांधींची पुढील माफी लवकरच येत आहे."