पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:34 IST2025-12-03T13:11:10+5:302025-12-03T13:34:00+5:30
सोमवारी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, रेणुका चौधरी श्वानाला संसदेत घेऊन आल्या होत्या. या प्रकरणी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराची मोठी चर्चा सुरू आहे.

पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी या सोमवारी (१ डिसेंबर) रोजी संसदेच्या आवारात त्यांच्या श्वानाला घेऊन आल्या होत्या. यामुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्यावर विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आज त्यांनी याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी भौ-भौ करत उत्तर दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाला आहे.
यावेळी चौधरी म्हणाल्या, जर हा प्रस्ताव आणला तर मी कडक प्रतिक्रिया देईन. चौधरी यांनी संसदेत उपस्थित असलेल्या लोकांचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला.
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
"विशेषाधिकार प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार? ते येईल तेव्हा पाहू. काय अडचण आहे? जेव्हा येईल तेव्हा मी योग्य उत्तर देईन, असंही चौधरी म्हणाल्या. जर त्यांना माझ्याविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणायचा असेल तर त्यांना द्या. मला त्याचा काही फरक पडत नाही. माजी पंतप्रधान वाजपेयी देखील संसदेत बैलगाडी घेऊन आले होते. हिंदू धर्मात श्वान महत्त्वाचे आहेत. मी कोणताही नियम मोडलेला नाही. मला त्याचा काही फरक पडत नाही, असंही चौधरी म्हणाल्या.
सोमवारी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, चौधरी श्वानाला संसदेत घेऊन आल्या. यावेळी पत्रकारांनी विचारले असता, त्या म्हणाल्या, "तो नम्र आहे आणि चावत नाही. संसदेत बसून सरकार चालवणारे लोकच चावतील." त्या म्हणाल्या की त्या भटक्या प्राण्याला उचलून पशुवैद्यकाकडे घेऊन जात आहेत.
भाजपचे आरोप
काँग्रेस नेत्यांनी फक्त संसदेच्या शिष्टाचाराचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन केले नाही तर तिथे काम करणाऱ्या सर्व खासदारांचा, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आणि इतर कर्मचाऱ्यांचाही अपमान केला.
पात्रा म्हणाले, "राहुल गांधी आणि रेणुका चौधरी यांच्या विधानांनी ज्या प्रकारे संसदेच्या शिष्टाचाराचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन केले आहे, त्या दोघांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की एक 'आर' खासदारांची जबाबदारी देखील दर्शवतो." पात्रा यांनी आरोप केला की, काँग्रेसच्या हताशतेत काँग्रेस "इतकी खालच्या पातळीवर" आहे की त्यांच्या नेत्यांनी संसदेतील त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना आणि 'मित्रांना'ही सोडले नाही.
VIDEO | Parliament Winter Session: Congress MP Renuka Chowdhury reacts over reports that the Rajya Sabha is considering initiating a privilege motion against her over her recent remarks involving dogs, says, "I will see when it will be brought... I will give a befitting reply..."… pic.twitter.com/yXifawrLT3
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2025