राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 07:35 IST2023-01-02T07:33:01+5:302023-01-02T07:35:19+5:30

मुंबईतील वांद्रे स्थानकावरून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसले. हा अपघात पाली जिल्ह्यातील राजकियावासच्या नजीक घडला.

jodhpur-bandra-suryanagari-express-derailed-at-rajkiawas-in-pali-many-injured-know-details-trains-diverted | राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; अनेकजण जखमी

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; अनेकजण जखमी

वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. ही घटना पाली येथील राजकीवासाजवळ घडली. या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. महाव्यवस्थापक-उत्तर पश्चिम रेल्वे आणि इतर उच्च अधिकारी जयपूर येथील मुख्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओंनी दिली.

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या 12 रेल्वे गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. तर दोन रेल्वे ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सध्या हा मार्ग बचाव कार्य पूर्ण झाल्यावक ब्लॉक करण्यात आलाय.

रेल्वेनं जारी केले हेल्पलाईन नंबर्स
जोधपुर: 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646
पाली मारवाड: 0293- 2250324, 0293- 2250138, 0293- 2251072

Web Title: jodhpur-bandra-suryanagari-express-derailed-at-rajkiawas-in-pali-many-injured-know-details-trains-diverted