JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 1 लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 12:27 IST2021-07-07T12:27:00+5:302021-07-07T12:27:09+5:30

BECIL AIIMS Recruitment 2021: इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने भरतीसाठी जाहिरात दिली आहे.

job ncr becil aiims recruitment 2021 for consultant and senior consultant posts apply online | JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 1 लाख पगार

JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 1 लाख पगार

नवी दिल्ली - एम्स दिल्लीमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नवी दिल्लीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिट (पीएमयू)मध्ये कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. कंपनीने 2 जुलै 2021 ला जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार दोन्ही पदांच्या एकूण 5 जागा रिक्त आहेत. या जागांवर भरती केली जाणार आहे.

या पदाची मुदत सुरुवातीला एक वर्षाची असणार आहे. हा कालावधी उमेदवाराचे काम आणि संस्थेची आवश्यकता पाहून वाढवण्यात येणार आहे. बेसिल्स एम्स भरती 2021 च्या जाहिरातीनुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 2 जुलैला सुरू झाली आहे. 15 जुलै 2021 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज शुल्क

ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. 
एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्या पदासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.


या पदांसाठी होणार भरती

सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (हॉस्पिटल मॅनेजमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट फायनांशिअल मॅनेजमेंट)
सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट)

किती मिळेल पगार?

कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास 50 हजार रुपये प्रतिमहा पगार मिळेल.
सिनियर कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास 1 लाख रुपये प्रतिमहा पगार मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: job ncr becil aiims recruitment 2021 for consultant and senior consultant posts apply online