शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

JNU Protest : दीपिका पादुकोण ही तुकडे गँगची सदस्या; भाजपा खासदार साक्षी महाराजांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 7:52 PM

दीपिकालाच फायद्याचे ठरले असून तिचे फॉलेअर्सही वाढले आहेत.

ठळक मुद्देआयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी दीपिकाचा छपाक सिनेमा रिलीज होत आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण हीने काल सायंकाळी जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. यावरून तिच्या आगामी छपाक सिनेमावर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली होती. तर सोशल मिडीयावर टीकाही झेलावी लागली होती. मात्र, तिथे जाणे दीपिकालाच फायद्याचे ठरले असून तिचे फॉलेअर्सही वाढले आहेत. 

या वादावर भाजपाचे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी वक्तव्य केले आहे. दीपिका पादुकोण ही तुकडे तुकडे गँगचीच असल्याचे म्हटले आहे. दीपिका पादुकोन हिने मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशान्यावर आली होती. एवढच नाही तर सोशल मीडियावर #BoycottChhapaak अशी मोहीम दीपिकाविरुद्ध राबविण्यात आली होती. जेएनयूमध्ये झालेल्या हिसेंचं समर्थन करणाऱ्या लोकांनी दीपिकाला देशद्रोही ठरवण्यास सुरुवात केली होती. तसेच लोकांनी तिचा आगामी छपाक सिनेमा पाहू नये, असं आवाहन करण्यात येत होतं. दीपिका पदुकोनला धडा शिकवण्यासाठी तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका, असं आवाहन करण्यात आले होते. अनेक युजर्सने दीपिकाला देशविरोधी म्हणत अनफॉलो केले. 

शुक्रवारी दीपिकाचा छपाक सिनेमा रिलीज होत आहे. या चित्रपटात तिने अॅसिड अटॅक पीडितेची भूमिका साकारली आहे. चित्रपटाआधीच झालेल्या या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे दीपिकाला मोठे नुकसान होईल, अशी शक्यता होती. मात्र याउलट घडले आहे. या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे दीपिकाच्या ट्विटरवरील फॉवर्समध्ये वाढ झाली आहे. एका आठवड्यात दीपिकाचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स वाढल्याचे सोशल मीडिया एनालिटीक्स करणाऱ्या Socialblade या वेबसाईटने सांगितले आहे. 

'छपाक' प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच झापले

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपिकाला तुकडे तुकडे गँगची सदस्या म्हणताना त्यांनी यामध्ये काही परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. 

तर जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशीवर भाजपाच्या आणखी एका नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य आले आहे. तिला खरेच जखम झाली होती की रंग लावला होता याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. जेएनयूमधील हिंसाचार तिच्याच सांगण्यावरून झाला होता असा आरोपही बंगालचा भाजपा प्रमुख दिलीप घोष यांनी केला आहे. 

 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणjnu attackजेएनयूSakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपा