शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये सापडलेल्या बॉम्बला निष्क्रिय करण्यात अपयश; आता बंकर तंत्राचा वापर केला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:23 IST

Jharkhand News: काही दिवसांपूर्वी झारखंडमधील सुवर्णरेखा नदीकिनारी दुसऱ्या महायुद्धातील 227 किलो वजनी जिवंत बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Jharkhand News:झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात दुसऱ्या महायुद्धातील 227 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे. 17 मार्च रोजी सापडलेला या बॉम्बला निष्क्रिय करण्यात अद्याप यश आले नाही. आता भारतीय सैन्याची विशेष बॉम्ब निकामी पथक ‘बंकर तंत्र’ (Bunker Technique) वापरून बॉम्बला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहे.

9 दिवसांपासून ऑपरेशन सुरू 

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील पानीपडा-नागुड़साई परिसरात सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर खोदकामादरम्यान हा 500 पाउंड (227 किलो) वजनाचा बॉम्ब आढळला होता. प्राथमिक तपासात हा बॉम्ब पूर्णपणे जिवंत अवस्थेत असल्याचे आढळून आले, त्यामुळे तो निष्क्रिय करणे अत्यंत धोकादायक मानले जात आहे. भारतीय सैन्याच्या तज्ज्ञ टीमने बॉम्बची वैज्ञानिक तपासणी केली असून, बंकर तंत्राने बॉम्ब निकामी केला जाणार आहे.

काय असते ‘बंकर तंत्र’?

या अत्यंत शक्तिशाली बॉम्बला निष्क्रिय करताना होणारे कंपन, स्फोटाचा दाब आणि उडणारा ढिगारा नियंत्रित करण्यासाठी सैन्य ‘बंकर तंत्र’ वापरणार आहे. या तंत्रामध्ये बॉम्बच्या चारही बाजूंनी वाळूने भरलेल्या पोत्यांची उंच भिंत तयार केली जाते आणि जमिनीमध्ये विशेष खड्डा तयार केला जातो. याद्वारे स्फोटाचा दाब जमिनीत शोषला जाईल अशी व्यवस्था केली जाते. यामुळे स्फोट परिणाम कमी होतो.

1 किलोमीटर परिसर रिकामा

सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने स्फोटक सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 1 किलोमीटर परिसरातील लोकांना तात्पुरते स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः पानीपडा गावातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण परिसर सैन्याने ताब्यात घेतला आहे. अधिकृत व्यक्तींनाच या भागात प्रवेश दिला जातोय. ऑपरेशनदरम्यान त्या परिसरात हेलिकॉप्टर किंवा विमान उड्डाणावरही बंदी घालण्यात आली आहे.

बॉम्ब इथे कसा आला? 

हा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन बॉम्ब असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्या काळात विमानातून हा या परिसरात टाकण्यात किंवा चुकून पडला असावा, अशी शक्यता आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही हा बॉम्ब जिवंत अवस्थेत आहे. महत्वाचे म्हणजे, ड्रोन सर्वेक्षणादरम्यान त्या परिसरात आणखी एक बॉम्ब असण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या ड्रोन सर्वे आणि मेटल डिटेक्टरद्वारे याचा शोध घेतला जातोय. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jharkhand Bomb Disposal Fails; Bunker Technique to Be Used Now

Web Summary : A WWII bomb found in Jharkhand remains active. Disposal failed after nine days. The army will now use the 'Bunker Technique' involving sandbag walls and underground absorption to safely neutralize it. A 1km evacuation zone is in effect while the operation continues.
टॅग्स :JharkhandझारखंडBombsस्फोटके