शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 9:53 AM

मोदी-शहांनी संपूर्ण ताकद लावूनही भाजपाचा झारखंडमध्ये पराभव

रांची: झारखंड विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र तरीही भाजपालाझारखंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हिंदी भाषिक पट्ट्यातलं आणखी एक राज्य गमावण्याची नामुष्की भाजपावर ओढवली. झारखंडमधील सत्ता कायम ठेवण्यासाठी मोदी-शहांनी सभांचा धडाका लावला होता. त्याठिकाणी नेमकं काय झालं, याची आकडेवारी मोठी रंजक आहे.झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं. या पाचही टप्प्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या. मोदींनी एकूण ९ सभांना संबोधित केलं. तर गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांनी मतदानाच्या तीन टप्प्यांमध्ये सभा घेतल्या. झारखंडमध्ये विधानसभेचे एकूण ८१ मतदारसंघ आहेत. मोदी आणि शहांनी प्रत्येकी ९ सभा घेत ६० मतदारसंघांमध्ये प्रचार केला. मात्र यातील ४० जागांवर भाजपाचा पराभव झाला. याचा अर्थ मोदी-शहांच्या सभांमुळे भाजपाला ३३.३३ टक्केच जागा जिंकता आल्या. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर शिवसेनेच्या सोबत जाणाऱ्या काँग्रेसनं झारखंडमध्ये निवडणुकीआधीच झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात काँग्रेसला यश आलं. झारखंडमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी ६ सभा घेतल्या. जवळपास २४ मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचार केला. यातील ८ जागा त्यांनी जिंकल्या. याचा अर्थ मोदी-शहांप्रमाणेच राहुल आणि प्रियंका यांनादेखील ३३.३३ टक्केच जागा जिंकता आल्या. 

टॅग्स :JharkhandझारखंडAmit Shahअमित शहाPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस