झारखंड : भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 08:15 IST2018-01-15T08:14:26+5:302018-01-15T08:15:36+5:30

झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील रविवारी (14 जानेवारी ) संध्याकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि रिक्षेच्या झालेल्या धडकेत 11 जणांचा जागी मृत्यू झाला.

Jharkhand: 11 killed after a truck collided with an auto rickshaw on NH 23 in Gumla | झारखंड : भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू 

झारखंड : भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू 

रांची - झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील रविवारी (14 जानेवारी ) संध्याकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि रिक्षेच्या झालेल्या धडकेत 11 जणांचा जागी मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग 23 वर ही भीषण दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये 5 महिला, 4 लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे चालकाला वाहन चालवण्यात अडथळा निर्माण झाल्यानं हा अपघात घडला आहे. 
तर या दुर्घटनेत अनेक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. जखमींवर रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफि मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेसंदर्भात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे.  



 



 

Web Title: Jharkhand: 11 killed after a truck collided with an auto rickshaw on NH 23 in Gumla

टॅग्स :Accidentअपघात