जेजुरीतील अतिक्रमणे हटविली
By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीतील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम आज सकाळीच सुरू झाली. संपूर्ण दिवसभर ही कारवाई चालूच होती.
जेजुरीतील अतिक्रमणे हटविली
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीतील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम आज सकाळीच सुरू झाली. संपूर्ण दिवसभर ही कारवाई चालूच होती.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. जेजुरीतील लवथळेश्वर मंदिर ते जुनी जेजुरी चौकापयंर्त रस्त्याच्या दोन्हीही बाजूच्या टपर्या, कच्ची बांधकामे, शेड आज काढण्यात आली. अतिक्रमणे काढून टाकावीत म्हणून तीन दिवसांपूर्वी शहरात दवंडी देण्यात आली होती. काहींनी आपली अतिक्रमणे काढून टाकली होती. मात्र अनेकांची अतिक्रमणे तशीच होती. आपण या कारवाईत बसत नाही असाच अनेकांचा समज होता. मात्र, आज प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली तेव्हा त्यांची धांदल उडाली होती. व्यावसायिक स्वत:हून अतिक्रमणे काढत होते.शहरातील अतिक्रमणे हटवताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजयकुमार ठुबे, शाखा अभियंता ज्ञानेश्वर हुंडेकरी, तहसीलदार संजय पाटील, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके जातीने हजर होते. अतिक्रमणे हटवताना शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. सोबत फोटो पाठवले आहेत