शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकांत जारकीहोळी, सवदी यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 02:02 IST

पोटनिवडणुकांसाठी ५ डिसेंबरला मतदान होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, कागवाड व अथणी मतदारसंघांत चुरशीची निवडणूक होत आहे.

- दादा जनवाडेनिपाणी (जि. बेळगाव) : कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघांतील प्रचार अंतिम टप्प्यात असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. पोटनिवडणुकांसाठी ५ डिसेंबरला मतदान होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, कागवाड व अथणी मतदारसंघांत चुरशीची निवडणूक होत आहे. प्रचारात नेत्यांचे पक्षांतर हाच प्रमुख मुद्दा बनला आहे. या निवडणुकीत जारकीहोळी बंधू, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व जोल्ले दाम्पत्य यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कर्नाटकातील सत्तानाट्यानंतर एकूण १७ पैकी १५ मतदारसंघांत पोटनिवडणूक होत असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव प्रचार करीत आहेत. या पोटनिवडणुका मुख्यमंत्री येडियुरप्पा व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भवितव्य ठरवणार आहेत.काँग्रेसमधून मंत्रीपद भूषविलेले रमेश जारकीहोळी हे भाजपतर्फे गोकाकच्या रिंगणात आहेत. काँग्रेसतर्फे लखन जारकीहोळी, तर निधर्मी जनता दलाकडून अशोक पुजारी रिंगणात आहेत. रमेश यांनी पाच वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. जारकीहोळी बंधंूचे नेहमीच बेळगाव जिल्ह्यावर वर्चस्व राहिले आहे.यापूर्वी रमेश, सतीश व भालचंद्र हे वेगवेगळ्या पक्षांत असले तरी एकत्र असल्याचे नेहमी जिल्ह्याने पाहिले आहे; पण यावेळी मात्र रमेश व लखन या सख्ख्या भावांमध्ये लढत असून, यामुळे रमेश यांच्यासमोर गड राखण्याचे मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात लिंगायत मतदार अधिक असून, याचा फायदा अशोक पुजारी उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपने या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे दिली आहे.श्रीमंत पाटील यांनी शिक्षण, सहकार, पाणी योजना, पतसंस्थांच्या माध्यमातून विकास केला आहे. या मतदारसंघात माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचा मोठा प्रभाव आहे. त्याचा फायदा कागे यांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीवेळी कागवाड मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले होते. याचा फायदा श्रीमंत पाटील यांना होऊ शकतो. या मतदारसंघात निधर्मी जनता दलाचे श्रीशैल शेट्टी यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात असले, तरी निवडणूक दुरंगीच होत आहे.अथणीमधून भाजपकडून महेश कुमठळ्ळी, तर काँग्रेसकडून गजानन मंगसुळी रिंगणात आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे महेश कुमठळ्ळी यांनी भाजप उमेदवार लक्ष्मण सवदी यांचा पराभव केला होता. हेच सवदी सध्या भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. सवदी यांना उपमुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात आमदार महेश कुमठळ्ळी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.एकेकाळी विरोधात असलेल्या कुमठळ्ळी यांचा प्रचार करणे सवदी यांना भाग पडले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद भूषविताना सवदी यांना कुमठळ्ळी यांच्या विजयासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. या मतदारसंघात सवदी यांच्यासह मंत्री शशिकला जोल्ले व भाजप खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटक