'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:31 IST2025-10-04T15:12:12+5:302025-10-04T15:31:28+5:30
आयटीआयच्या दीक्षांत समारंभात तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेने कर्पूरी ठाकूर यांना जननायक ही पदवी दिली आहे. "जननायक" ही पदवी चोरली जात आहे. बिहारच्या लोकांनी सतर्क राहिले पाहिजे.

'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
पंतप्रधान सेतू योजना आणि आयटीआय दीक्षांत समारंभाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित युवा संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विज्ञान भवनातून राहुल गांधी आणि बिहारच्या लालू-राबडी सरकारवर निशाणा साधला. 'भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांची 'जननायक' ही पदवी चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहारच्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे. अलिकडेच मतदार हक्क यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना 'जननायक' म्हटले होते आणि पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी तेजस्वी यादव यांना जननायक म्हटले होते. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांना जननायक म्हणत एक पोस्ट करण्यात आली होती, यावरुन मोदींनी निशाणा साधला आहे.
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
"बिहारला कौशल्य दीक्षांत समारंभात एक नवीन कौशल्य विद्यापीठ मिळाले आहे. नितीश कुमार यांच्या सरकारने या विद्यापीठाचे नाव भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या नावावर ठेवले आहे. मी बिहारच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगू इच्छितो. जननायक ही पदवी कर्पुरी ठाकूर यांच्यासाठी योग्य आहे. बिहारच्या लोकांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा सन्मान दिला. आजकाल काही लोकांनी जननायक ही पदवीही चोरायला सुरुवात केली आहे. म्हणून, मी बिहारच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. आमच्या कर्पुरी ठाकूर साहिब यांना लोकांनी दिलेला सन्मान कोणीही चोरू नये, असेही पीएम मोदी म्हणाले.
"ज्या झाडाच्या मुळांना किडे लागले आहेत, त्याला पुन्हा जिवंत करणे हे एक पराक्रम आहे असे पंतप्रधान म्हणाले. राजदच्या कुशासनात बिहार त्या झाडासारखा झाला होता. सुदैवाने, बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांना संधी दिली आणि संपूर्ण एनडीए टीमने मिळून बिहारला पुन्हा रुळावर आणले. आजच्या या कार्यक्रमात हे स्पष्ट होते, असेही मोदी म्हणाले.