Jammu Kashmir: काश्मिरात पुन्हा दहशतवादी हल्ला, शोपियांमध्ये स्थलांतरित मजुरांवर फेकले ग्रेनेड, 2 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 00:31 IST2022-06-04T00:30:40+5:302022-06-04T00:31:27+5:30
या दहशतवादी हल्ल्यात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळापळ करत होते.

सांकेतिक छायाचित्र
काश्मीरमध्ये परप्रांतीयांवर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. आता दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. यात दोन मजूर जखमी झाले आहेत. खरे तर सुरुवातील, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा गॅसचा स्फोट नसून दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिली माहिती -
या दहशतवादी हल्ल्यात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळापळ करत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर केलेल्या तपासात, दहशतवाद्यांनी परप्रांतीयांवर ग्रेनेडने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोन मजूर जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अगलर जैनापोरा भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे.
बडगाममध्ये स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला -
बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर गुरुवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 1 मजुराचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला श्रीनगर येथील SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचास सुरू आहेत.
हा हल्ला बडगाममधील मगरेपोरा चडूरा भागात झाला होता. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश, असल्याचे सांगण्यात येते. तो बिहारचा रहिवासी होता. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अथवा काश्मीर बाहेरील हिंदूंवरील हल्ले वाढले आहे.