बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 05:02 PM2024-06-11T17:02:37+5:302024-06-11T17:04:12+5:30

9 जून रोजी वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 41 जखमी झाले.

Jammu Kashmir Riasi Attack : All would have been shot if the bus had not plunged into the ravine; Eyewitnesses told the story | बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...

बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...

Jammu Kashmir Riasi Attack : 9 जून रोजी एकीकडे केंद्र सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होता, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 41  जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर एक गोळी चालकाला लागली, ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले अन् गाडी थेट दरीत कोसळली. आता या घटेबाबात एत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्या बसमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानेचे भाविक होते. ते सर्वजण माता वैष्णदेवीच्या दर्शनासाठी कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात येताच दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यावेळी गोंडा येथील एक तरुणी बसमध्येच होती. तिने घडलेली सर्व घटना मीडियाला सांगितली. 'दहशतवादी सलग 15 मिनिटे गोळीबार करत होते. चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली नसती, तर दहशतवाद्यांनी सगळ्यांना गोळ्या घालून ठार केले असते,' अशी माहिती तिने दिली. 

दिल्लीतील रहिवासी शंकर हेदेखील आपल्या पत्नी आणि दाेन लहान मुलांसह याच बसमधून जात हाेते. दहशतवाद्यांनी 10 ते 15 सेकंदांमध्ये 20 ते 25 गाेळ्या बसवर झाडल्या. एक गाेळी बसचालकाला लागली आणि त्यामुळे बस अनियंत्रित झाल आणि दरीत खडकांमध्ये अडकली. काही जण ‘हमला हाे गया हैं’, असे ओरडू लागल्याचे शंकर यांनी सांगितले.  

बसमध्ये स्वार असलेल्या तरुणाने सांगितले...
वाराणसीतील रहिवासी अतुल आपल्या पत्नीसोबत बसमध्येत होता. त्याने सांगितले की, तो पुढच्या सीटवर बसला आहे. अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. बसच्या पुढील काचा फुटल्या. त्यानंतर सर्व प्रवासी सीटखाली लपून बसले. काही वेळातच बस दरीत कोसळली. 

तीन संघटनांनी घेतली हल्ल्याची जबाबदारी 
पीपल्स ॲंटी रेसिस्ट फाेर्स, रिव्हायवल ऑफ रिझिस्टन्स आणि द रेझिस्टंट फाेर्स या लष्कर-ऐ-ताेयबा आणि जैश-ए-माेहम्मद या दहशवादी संघटनांशी संबंधित संघटनांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली हाेती. मात्र, नंतर त्यांनी जबाबदारी झटकली. 

Web Title: Jammu Kashmir Riasi Attack : All would have been shot if the bus had not plunged into the ravine; Eyewitnesses told the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.