जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:25 IST2025-10-24T19:22:12+5:302025-10-24T19:25:15+5:30
Jammu Kashmir Rajya Sabha Election Result: कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिलीच राज्यसभा निवडणूक!

जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
Jammu Kashmir Rajya Sabha Election Result:जम्मू-काश्मीरमधीलराज्यसभा निवडणुकीचे निकाल आज (२४ ऑक्टोबर) जाहीर झाले. राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स (NC) नं 4 पैकी 3 जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्षानं एका जागेवर विजय मिळवला. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार चौधरी मोहम्मद रमजान, सज्जाद किचलू आणि शमी ओबेरॉय यांनी निवडणुकीत विजय मिळवला, तर भाजपचे सत शर्मा यांनी जिंकले.
Rajya Sabha elections | JKNC senior leader Choudhary Mohammad Ramzan elected to the Rajya Sabha from Jammu and Kashmir, after winning by 58 votes. Party leaders Sajad Kichloo and Shammi Oberoi also won two respective seats, says the National Conference.
— ANI (@ANI) October 24, 2025
कोणाला किती मतं मिळाली?
चौधरी मोहम्मद रमजान (NC) - 58 मतं
सज्जाद किचलू (NC) - 57 मतं
गुरुविंदर सिंग उर्फ शम्मी ओबेरॉय (NC) - 31 मतं (जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेत जाणारे पहिले शीख नेते)
सत शर्मा (BJP) - 32 मतं
निवडणूक अतिशय महत्वाची
ही राज्यसभा निवडणूक अतिशय महत्वाची होती. कारण, कलम 370 रद्द झाल्यानंतरची पहिली राज्यसभा निवडणूक आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाल्यानंतर, राज्यसभा निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवडणूक आयोगानं या चार जागांसाठी तीन वेगवेगळ्या अधिसूचना काढल्या होत्या. दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणुका, तर दोन जागांसाठी एकत्र निवडणूक घेण्यात आली.