शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

'केंद्राने 2 महिन्यांत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा', सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:46 IST

Jammu Kashmir News: याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.

Jammu Kashmir News: काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या अन् राज्यात नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील सरकारही स्थापन झाले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीवर लवकरच सुनावणी घेणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात शांततेत निवडणुका पार पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच आता राज्याचा दर्जा देण्यास विलंब होता कामा नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने काय म्हटले? काश्मीरमधील शिक्षक जहूर अहमद भट आणि समाजसेवक खुर्शीद मलिक यांनी ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निवेदनाचा दाखला त्यांनी दिला आहे. कलम 370 प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार यांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यानंतर राज्याचा दर्जाही बहाल केला जाईल, असे सांगितले होते.

2 महिन्यांत पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीजम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा न देणे हे भारताच्या संघराज्याच्या विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सुरक्षेची चिंता, स्थानिक हिंसाचार किंवा इतर कोणताही त्रास होण्याची शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा देण्यात कोणताही अडथळा नाही. त्यामुळे न्यायालयाने केंद्राला 2 महिन्यांत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय