Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 07:30 IST2018-06-28T07:30:33+5:302018-06-28T07:30:57+5:30

ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला.

Jammu Kashmir: Murderist of Journalist Shujaat Bukhari are got identified | Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

श्रीनगर : ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार यापैकी दोन मारेकरी दक्षिण काश्मीरमधील आहेत, तर तिसरा पाकिस्तानी नागरिक आहे.
शुजात बुखारी यांच्या पाकिस्तानी मारेक-याचे नाव जावीद जाट असे असून, तो ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंधित आहे. ‘लष्कर’ने मात्र या खुनाशी आपला संबंध असल्याचा इन्कार केला आहे. समाजमाध्यमांतून बुखारी यांच्याविरुद्ध बदनामी मोहीम चालविणाºया ब्लॉगरचीही ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो श्रीनगरचा असून, सध्या मात्र पाकिस्तानात राहत आहे.

Web Title: Jammu Kashmir: Murderist of Journalist Shujaat Bukhari are got identified