Jammu Kashmir : तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 15:12 IST2018-05-05T08:26:27+5:302018-05-05T15:12:17+5:30

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Jammu Kashmir: Encounter started between terrorists and security forces in Chattabal area of Srinagar | Jammu Kashmir : तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

Jammu Kashmir : तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये चट्टाबाल परिसरात सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. शनिवारी (5 मे) सकाळी जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. दरम्यान, या चकमकीत दोन सीआरपीएफचे जवान आणि एक पोलीसदेखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चट्टाबालमध्ये तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्काराला मिळाली होती. त्यानुसार परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान, 11 वाजण्याच्या सुमारास एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते.



 



 



 



 




 

दरम्यान, शुक्रवारी हाजिन येथील शाहदगुंड गावात दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचे गुलशन मोहल्ला परिसरातील त्यांच्या निवासस्थानाहून अपहरण करण्यात आले होते. 
 



 

Web Title: Jammu Kashmir: Encounter started between terrorists and security forces in Chattabal area of Srinagar