CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:11 IST2025-11-14T19:10:05+5:302025-11-14T19:11:08+5:30
Jammu-Kashmir By Election: नगरोटात भाजपचा विजय, तर बडगाममध्ये पीडीपीने बाजी मारली.

CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
Jammu-Kashmir By Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांसोबतच देशातील सात राज्यांमधील आठ पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर झाले. जम्मू-कश्मीरमधील नगरोटा आणि बडगाम या दोन विधानसभा जागांवरची मतमोजणीही पूर्ण झाली असून दोन्ही ठिकाणी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचा पराभव झाला आहे.
नगरोटा मतदारसंघ
नगरोटा विधानसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप उमेदवार देवयानी राणा यांनी 24,647 मतांच्या भक्कम आघाडीसह विजय मिळवला आणि आपल्या वडिलांचा (दिवंगत देवेंद्र सिंह राणा ) यांचा राजकीय वारसा पुढे नेला.
देवयानी राणा - 42,350 मते
हर्ष देव सिंह (जेकेएनपीपी) - 17,703 मते
शमीम बेगम (नेशनल कॉन्फरन्स) - 10,872 मते
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या देवयानी यांनी विजय निश्चित केला. विजयानंतर त्या म्हणाल्या, “नगरोटातील मतदारांनी माझ्या वडिलांना जसे आशीर्वाद दिले, तसेच मला दिले. मी याची सदैव ऋणी राहीन.”
बडगाम
बडगाम विधानसभा सीटवर मोठ्या उलथापालथीत पीडीपी उमेदवार अगा सैयद मुंतजिर मेहदी यांनी विजय मिळवला. त्यांनी नेशनल कॉन्फरन्सचे उमेदवार अगा सैयद महमूद अल-मोसावी यांना पराभूत केले.
अगा सैयद मुंतजिर मेहदी (पीडीपी) - 21,576 मते
अगा सैयद महमूद अल-मोसावी (नेशनल कॉन्फरन्स) - 17,098 मते
4,478 मतांच्या फरकाने झालेला हा विजय नेशनल कॉन्फरन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या दोन्ही जागा रिक्त का झाल्या?
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी 2024 च्या निवडणुकीत दोन जागांवरुन विजय मिळवला होता. त्यांनी गांदरबल सीट कायम ठेवत बडगाम जागा रिक्त केली; त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. तर नगरोटा जागा राजकीय परिस्थितीमुळे ऑक्टोबर 2024 पासून रिक्त होती. बिहारच्या निकालांसह जम्मू-कश्मीरच्या या पोटनिवडणुकांनी प्रदेशाच्या राजकीय समीकरणांमध्ये नवी हालचाल निर्माण केली आहे. नगरोटावर भाजपची मजबूत पकड कायम राहत असताना बडगाममधील पीडीपीचा विजय आगामी राज्यराजकारणात महत्त्वाचा ठरणार आहे.