J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:55 IST2025-07-30T14:54:56+5:302025-07-30T14:55:45+5:30

Jammu-Kashmir: 'ऑपरेशन महादेव' नंतर आता सुरक्षा दल 'ऑपरेशन शिवशक्ती' राबवत आहेत.

Jammu-Kashmir: 48 hours, 4 operations and 5 terrorists killed; Security forces get big success | J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश

J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश

Jammu-Kashmir: दहशतवादाचा समूळ नाष करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सुरक्षा दलांकडून तीव्र कारवाई सुरू आहे. 'ऑपरेशन महादेव' नंतर आता सुरक्षा दल 'ऑपरेशन शिवशक्ती' राबवत आहेत. याअंतर्गत सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत ४ यशस्वी कारवाया केल्या असून, यात दाचीघम भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील ठार मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना आणखी एक यश मिळाले आहे. बुधवारी 'ऑपरेशन शिवशक्ती' अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये घुसखोरी करताना सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या दहशतवाद्यांकडून तीन शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

नागरोटा भागातही पोलिसांनी एका दहशतवाद्याच्या साथीदाराला तीन पिस्तूलांसह अटक केली आहे. या दहशतवादी साथीदाराचे नाव अजान हमीद गाजी आहे, जो श्रीनगरचा रहिवासी आहे. अजान त्याच्या टोयोटा कारमधून जम्मूहून काश्मीर खोऱ्यात जात होता, तेव्हा पोलिसांनी त्याला नागरोटा चेकपोस्टवर थांबवले. तपासात त्याच्याकडे तीन तुर्की आणि चिनी बनावटीच्या पिस्तूल आढळल्या. 

पीओकेमध्ये ४० दहशतवादी छावण्या सक्रिय
अलिकडच्या अहवालानुसार, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये आता फक्त ४० दहशतवादी छावण्या सक्रिय आहेत, ज्यामध्ये सुमारे ११० ते १३० दहशतवादी आहेत. तर, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या एकूण १३५ ते १४० दहशतवादी सक्रिय आहेत, त्यापैकी ६० ते ६५ दहशतवादी जम्मूमध्ये आणि ७० ते ७५ दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. यातील ११५ दहशतवादी पाकिस्तानी आहेत.

Web Title: Jammu-Kashmir: 48 hours, 4 operations and 5 terrorists killed; Security forces get big success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.