शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 1:40 PM

काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आलं आहे.

श्रीनगर: काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आलं आहे. उरी सेक्टरमध्ये आज सकाळी सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. सुरक्षा दलाकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांना उरीमध्ये झालेल्या चकमकीत ठार करण्यात आल्याच्या वृत्ताला लष्करातील एका अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांविरोधात सीमा सुरक्षा दलाने अधिक वेगाने कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जवानांनी सहा महिन्यात 80 अतिरेक्यांना ठार केलं आहे. दरम्यान, शनिवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे राजपुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरterroristदहशतवादी