जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 22:09 IST2024-11-07T22:08:50+5:302024-11-07T22:09:04+5:30
किश्तवाड़ जिल्ह्यातील एका गावात हा हल्ला करण्यात आला आहे. फोटोही दहशतवाद्यांनी व्हायरल केले आहेत.

जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
जम्मू काश्मीरमध्ये एका गावामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये गाव रक्षण समितीच्या दोन सदस्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी या दोघांना त्रासही देण्यात आला आहे. याचे फोटोही दहशतवाद्यांनी व्हायरल केले आहेत. पोलीस आणि सैन्याने शोधमोहिम सुरु केली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
किश्तवाड़ जिल्ह्यातील एका गावात हा हल्ला करण्यात आला आहे. मोहम्मद खलील आणि अमर चंद हे ओहली कुंतवारा गावाचे रहिवासी आहेत. ते गुरे चारण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले होते. तिथे दहशतवादी दबा धरून बसले होते. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. याचे फोटोही काढले आणि व्हायरल केले आहेत. या दोघांचे तोंड कापडाने बांधण्यात आले होते. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
ज्या प्रकारे त्यांचे तोंड बांधण्यात आले त्यानुसार मरण्यापूर्वी या दोघांना पिडा देण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यातील सुरक्षा कडक करण्यात आली असून लष्कराचे जवान जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.