शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जेटली डीडीसीएच्या चौकशीला का घाबरतात ? - केजरीवाल

By admin | Updated: December 16, 2015 10:16 IST

अरुण जेटली डीडीसीएच्या चौकशीला इतके का घाबरतात ? डीडीसीए घोटाळयात त्यांची काय भूमिका होती ? असे प्रश्न केजरीवालांनी विचारले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - दिल्लीचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्यावर  झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे. अरुण जेटली यांना वाचवण्यासाठी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे. 

अरुण जेटली डीडीसीएच्या चौकशीला इतके का घाबरतात ?  डीडीसीए घोटाळयात त्यांची काय भूमिका होती ? असे प्रश्न केजरीवालांनी टि्वटरवरुन विचारले आहेत. बुधवारी सकाळी केलेल्या टि्वटसमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयचे अधिकारी माझ्या कार्यालायतील डीडीसीएच्या फाईल्स वाचत बसले होते असा दावा केला आहे. 
माझ्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा आरोपांशी संबंध नसल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे. सीबीआयचे अधिकारी डीडीसीएच्या फाईल्स जप्त करु शकत होते. माझ्या पत्रकारपरिषदेनंतर ते निघून गेले. त्यांनी फाईल्सची प्रत सोबत नेली किंवा नाही ते अजून स्पष्ट नाही असे केजरीवालांनी म्हटले आहे. 
छापे केजरीवालांच्या नव्हे तर त्यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर मारल्याचे सीबीआयने स्पष्ट केले असले तरी, कारवाई आपल्याला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आली असा दावा केजरीवालांनी केला आहे.