‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:44 IST2026-01-11T16:43:52+5:302026-01-11T16:44:21+5:30
Masood Azhar News: जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने पुन्हा एकदा भारताला धमकी देणाऱा ऑडियो प्रसारित केला आहे. त्यात त्याने आपल्या संघटनेकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर असून, ते कुठल्याही वेळी हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशी धमकी दिली आहे.

‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
गतवर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. त्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अड्डाही उदध्वस्त झाला होता. मात्र या हल्ल्यातून सावरल्यानंतर आता जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने पुन्हा एकदा भारताला धमकी देणाऱा ऑडियो प्रसारित केला आहे. त्यात त्याने आपल्या संघटनेकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर असून, ते कुठल्याही वेळी हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशी धमकी दिली आहे.
आपल्या संघटनेमध्ये अल्लाहचे असे फिदाईन आहेत. जे पहाटे तीन वाजता उठून अल्लाहकडे केवळ शहादत मागतात, असे समोर आलेल्या ऑडियो क्लिपमध्ये मसूद अझहर हा सांगताना दिसत आहे. माझ्या संघटनेतील दहशतवादी कोणतीही संसारिक सूख-सुविधा किंवा अन्य कुठलाही लाभ मागत नाहीत. तसेच माझ्या संघटनेत असलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जरी सांगितला तरी जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ उडेल, असा दावाही मसूद अझहरने केला. त्यामुळे मसूद अझहरने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित दहशतवाद्यांची फौज उभी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, संरक्षण क्षेत्रामधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखादी दहशतवादी संघटना जेव्हा दबावाखाली असते. तेव्हा असे ऑडियो संदेश प्रसारित केले जातात. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आल्यानंतर आता काही काळाने हे ऑडियो संदेश समोर आले आहेत. तसेच त्यामधून खवळलेल्या मसूद अझहर याची मानसिकता समोर येत आहे.