शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
7
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
8
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
9
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
10
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
11
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
12
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
13
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
14
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
15
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
16
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
17
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
18
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
19
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
20
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर

PM मोदींचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी; काँग्रेस म्हणते- 'तुम्ही कुणावर उपकार नाही केले...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 15:18 IST

Jairam Ramesh On PM Modi : पीएम मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच दिवशी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा 17वा हप्ता देण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली.

Jairam Ramesh On PM Modi :नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.7) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी(दि.10) नरेंद्र मोदींनी कार्यलयात जाऊन पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली. ही फाईल शेतकऱ्यांशी संबंधित असून, याद्वारे किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या पहिल्या निर्णयावर काँग्रेसकडून टीका केली जात आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे पीएम मोदींवर टीका केली. ते लिहितात, 'पंतप्रधानांचे हेडलाईन व्यवस्थापन आणि पीआर टीम तिसऱ्या टर्मच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा 17वा हप्ता देण्यासाठी पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या' PM किसान निधीचा 16 वा हप्ता जानेवारी 2024 मध्ये मिळणार होता, परंतु पंतप्रधानांना निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी त्यात एक महिन्याचा उशीर केला. यानंतर 17 वा हप्ता एप्रिल/मे 2024 मध्ये मिळणार होता, परंतु आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यास विलंब झाला.'

'आता पंतप्रधानांनी या फाईलवर स्वाक्षरी करुन कोणावरही मोठे उपकार केलेले नाहीत. हे त्यांच्या सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे न्याय्य हक्क आहेत. दैनंदिन आणि नित्याच्या प्रशासकीय निर्णयांना मोठ्या स्वरुपात दाखवण्याची त्यांना सवय लागली आहे. वरवर पाहता, तो अजूनही स्वत: ला अजूनही दैवी शक्ती मानतात. जर त्यांना खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताची काळजी असेल, तर त्यांनी या पाच गोष्टी केल्या असत्या. 1. योग्य किंमत - स्वामीनाथन सूत्रावर आधारित MSP ची कायदेशीर हमी. 2. कर्जमाफी - कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थायी आयोग. 3. विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण - पीक नुकसान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातात. 4. योग्य आयात- निर्यात धोरण - शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून नवीन आयात-निर्यात धोरण करणे,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल