शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:21 IST

जयपूरमधील एका प्रतिष्ठित शाळेची विद्यार्थिनी असलेल्या ९ वर्षांच्या अमायराने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

जयपूरमधील एका प्रतिष्ठित शाळेची विद्यार्थिनी असलेल्या ९ वर्षांच्या अमायराने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता तिच्या आईने मोठा खुलासा केला आहे. "मला शाळेत जायचं नाही, प्लीझ पाठवू नका..." असं अमायरा तिच्या आईला सांगत होती. आई शिवानीने याचं ऑडिओ रेकॉर्डिंग सर्वांना दाखवलं. शिवानीने दिलेल्या माहितीनुसार, शाळेला याबाबत माहिती देण्यात आली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केलं.

गेल्या वर्षभरापासून जयपूरच्या नीरजा मोदी शाळेतील ९ वर्षांच्या अमायराचे पालक शाळेतील शिक्षकांकडे तक्रार करत होते की, काही मुलं अमायराची छेड काढतात, तिला टोमणे मारतात आणि तिची चेष्टा करतात. शाळेतील शिक्षकांशी अनेक वेळा बोलले, पण ते दुर्लक्ष करत राहिले. अमायराच्या वडिलांनी देखील मीटिंगमध्ये याबाबत माहिती दिली होती. अमायराने तिला त्रास देणाऱ्या काही मुलांची नावं सांगितली होती.

शिक्षिकेने पालकांना सांगितलं की, शाळेत अमायराने सर्व विद्यार्थ्यांशी, अगदी मुलांशीही बोलायला शिकले पाहिजे. त्यावर पालकांनी शिक्षिकेला मुलांशी बोलायचं की नाही हा माझ्या मुलीचा निर्णय आहे असं देखील म्हटलं होतं. अमायराला बुलिंगचा त्रास झाला होता. परंतु शाळेने कधीही हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच अमायराने टोकाचा निर्णय घेतला.

९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

शिवानी म्हणते की, "आम्ही पुढच्या वर्षी तिला दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या मुलीला सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश देण्यासाठी मी स्थानिक आमदार राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याशीही बोलले. पण ते होऊ शकलं नाही." अमायराने उडी मारल्यानंतर शाळा प्रशासनाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं.

English
हिंदी सारांश
Web Title : Bullying, School Neglect, and a Fatal Jump: Amayra's Tragedy Unfolds

Web Summary : Nine-year-old Amayra jumped from her school's fourth floor after alleged bullying. Her mother claims the school ignored repeated complaints about the harassment. Amayra pleaded not to be sent to school. The family planned to transfer her, but tragedy struck. The school reportedly tried to destroy evidence.
टॅग्स :Rajasthanराजस्थानSchoolशाळाStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू