भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:54 IST2025-11-03T17:53:57+5:302025-11-03T17:54:57+5:30
Video - नशेत असलेल्या एका डंपर चालकाने वेगाने गाडी चालवत आधी बाईकला जोरदार धडक दिली आणि नंतर रस्त्यावरील लोकांना आणि इतर वाहनांना चिरडलं.

भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
जयपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नशेत असलेल्या एका डंपर चालकाने वेगाने गाडी चालवत आधी बाईकला जोरदार धडक दिली आणि नंतर रस्त्यावरील लोकांना आणि इतर वाहनांना चिरडलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये डंपर वेगाने जात असल्याचं पाहायला मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की डंपरखाली अनेक मृतदेह अडकले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कांवटिया रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काही वाईक डंपरखाली अडकल्या होत्या आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.
जयपुर में यमराज बनकर सड़क पर उतरा डंपर!
— अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) November 3, 2025
60 से ज्यादा लोगों को रौंदा, 19 की हुई मौत
इस CCTV वीडियो को देखकर कांप जाएगी रूह#JaipurNews#Rajasthan#RoadAccidentpic.twitter.com/0ADkFT7MNV
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. घटनेनंतर रुग्णालयांमध्ये शोककळा पसरली. ट्रॉमा सेंटरच्या बाहेर मृतांच्या कुटुंबियांना आक्रोश पाहायला मिळाला. या अपघातानंतर रस्त्यावर भयंकर दृश्य होतं. सर्वांनाच यामुळे मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कॅबिनेट मंत्री सुमित गोदरा आणि सुरेश सिंह रावत यांना अपघातानंतर तातडीने रुग्णालयात पाठवलं. त्यांनी जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. ट्रॉमा सेंटरचे नोडल अधिकारी बीएल यादव यांनी सांगितलं की, सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत आणि काहींना कांवटिया रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
जयपुर में बड़ा सड़क हादसा
बेकाबू ट्रक ने कई कारों को मारी टक्कर
कार को टक्कर मारने के बाद पलटा डंपर
कई बाइक सवारों को भी कुचला
हादसे में 7 लोगो की मौत pic.twitter.com/WdjYP7Qu66— Gaurav Kumar (@gaurav1307kumar) November 3, 2025