जगदीप धनखड यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार, १४ व्या वर्षीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:59 IST2025-07-22T13:57:42+5:302025-07-22T13:59:37+5:30
Jagdeep Dhankhar Family Tragedy: आजही या आजाराला अतिशय धोकादायक मानले जाते.

जगदीप धनखड यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार, १४ व्या वर्षीच झाला मृत्यू
Jagdeep Dhankhar Family Tragedy: आई-वडीलांसाठी आपल्या मुलाला गमावणे, ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. सामान्य व्यक्ती असो वा कोणी खास, मुलाला गमावण्याच्या वेदना कोणीही सहन करू शकत नाही. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासोबतही असेच काही घडले आहे, जे ते कधीही विसरू शकत नाहीत.
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड यांचा मुलगा दीपक धनखड याचे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी निधन झाले होते. याचे कारण म्हणजे, तो एक अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीच्या अशा ब्रेन हॅमरेजने ग्रस्त होता. दीपकच्या मृत्यूनंतर जगदीप धनखर आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झाले. हळुहळू ते सावरले आणि स्वतःला पूर्ण समर्पणाने समाजसेवा आणि राजकारणात वाहून घेतले.
हा आजार इतका धोकादायक का आहे?
ब्रेन हॅमरेजचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे, हा अचानक होतो आणि अनेकदा लोकांना लक्षणेही समजत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये, उपचार सुरू करण्यापूर्वीच ही स्थिती गंभीर बनते. त्याच्या उपचारांसाठी ऑपरेशन, औषधे आणि दीर्घकालीन वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते. आजही, हा आजार प्राणघातक मानला जातो, विशेषतः जर रुग्ण तरुण असेल. मुलांमध्ये या प्रकारची स्थिती आणखी धोकादायक बनते, कारण त्यांचे शरीर ते सहन करू शकत नाही.