माध्यमांवर निर्बंध लावणे अशक्य- जेटली मीडियासाठी आर्थिक मॉडेल असावे : पेड न्यूजला आळा हवाच
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
नवी दिल्ली : सध्याच्या युगात माहितीच्या प्रसारणावर निर्बंध (सेन्सॉरशिप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आणि माध्यमांकडे ठोस असे आर्थिक मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार झिरपत राहण्याची शक्यता आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
माध्यमांवर निर्बंध लावणे अशक्य- जेटली मीडियासाठी आर्थिक मॉडेल असावे : पेड न्यूजला आळा हवाच
नवी दिल्ली : सध्याच्या युगात माहितीच्या प्रसारणावर निर्बंध (सेन्सॉरशिप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आणि माध्यमांकडे ठोस असे आर्थिक मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार झिरपत राहण्याची शक्यता आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकीकरणामुळे बातमीची व्याख्या आणि ग्राहकाची वर्तणूक बदलली आहे. या दिवसांत कॅमेर्यात जे बंदिस्त होत नाही, अशा बाबीला बातमीमूल्य उरलेले नाही. थोडक्यात, कॅमेर्यात दिसत नसेल तर ती बातमी ठरत नाही. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. सर्व वृत्तसंस्थांसाठी आर्थिक मॉडेल हे प्रत्यक्षात उतरले जावे. तसे होत नाही ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच पथभ्रष्टतेचा मार्ग अवलंबला जाण्याची भीती असते. पेड न्यूज हा त्यातीलच प्रकार आहे. निवडणूक आयोगानेही पेड न्यूजबद्दल चिंता व्यक्त करीत अटकाव घालण्यासाठी मार्ग शोधला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)-----------हे स्पर्धेचे युग...सध्याच्या युगात मीडियावर सेन्सॉरशिप लादणे अशक्य आहे. सुदैवाने जगभरातील वृत्तपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांवर निर्बंध लादण्याच्या फारच मोजक्या घटना घडल्या आहेत. सध्या निर्बंध आणले गेले तरी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकीकरणामुळे अंमलबजावणी अशक्य आहे. सध्या स्पर्धेचे युग असून अधिकाधिक नजरा आपल्याकडे वळविण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड केली जात आहे. तथापि दीर्घ पल्ला गाठताना सवार्ेत्कृष्ट ते यशस्वी होईल यावर माझा विश्वास आहे, असेही जेटली म्हणाले.