बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही अशक्य, भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:32 IST2018-07-09T04:31:56+5:302018-07-09T04:32:13+5:30

बलात्कार करणे ही नैसर्गिक विकृती आहे. साक्षात प्रभू रामचंद्रदेखील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखू शकणार नाहीत, असे वादग्रस्त उद्गार उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी शनिवारी काढले.

 It is impossible for Prabhu Ramchandra to stop the incident of rape, BJP's controversial statement to the MLA | बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही अशक्य, भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही अशक्य, भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

लखनौ - बलात्कार करणे ही नैसर्गिक विकृती आहे. साक्षात प्रभू रामचंद्रदेखील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखू शकणार नाहीत, असे वादग्रस्त उद्गार उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी शनिवारी काढले.
ते पुढे म्हणाले की, बलात्काराच्या नैसर्गिक विकृतीने सर्वांनाच पछाडले आहे. जर लोकांनी महिलांना भगिनीसमान मानले, कुटुंबीयांशी वागतो त्या स्नेहाने त्यांच्याशी वर्तन केले, तरच बलात्काराच्या घटनांना आळा घालता येईल. राज्यघटनेतील कायद्यांनी नव्हे, तर मूल्यांद्वारेच हे
शक्य होईल.

उधळलेली मुक्ताफळे

- याआधी उन्नाव येथे एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले व त्यापायी तुरुंगाची हवा खावी लागलेले भाजपाचे आमदार कुलदीपसिंह सेनगर यांना पाठिंबा देऊन सुरेंद्र नारायण सिंह यांनी वादळ निर्माण केले होते.
- गेल्याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची वेश्यांशी तुलना करून, तसेच पालक व स्मार्ट फोनमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, अशी मुक्ताफळे उधळून त्यांना वाद ओढवून घेतला होता.
 

Web Title:  It is impossible for Prabhu Ramchandra to stop the incident of rape, BJP's controversial statement to the MLA