शिवालिक, नंदादेवीनंतर आता 'जग लाडकी' जहाजही भारतात पोहचलं; स्ट्रेट होर्मुझमधून केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:40 IST2026-03-18T13:39:42+5:302026-03-18T13:40:23+5:30

शिवालिक, नंदादेवी आणि जग लाडकी ही जहाजे त्या २२ जहाजांमधील आहेत जे युद्ध काळात स्ट्रेट होर्मुझ बंद झाल्याने पश्चिमी भागात अडकली होती

Iran US-Isreal War: After Shivalik, Nanda Devi, now 'Jag Ladki' ship also reaches India; Traveled through Strait of Hormuz | शिवालिक, नंदादेवीनंतर आता 'जग लाडकी' जहाजही भारतात पोहचलं; स्ट्रेट होर्मुझमधून केला प्रवास

शिवालिक, नंदादेवीनंतर आता 'जग लाडकी' जहाजही भारतात पोहचलं; स्ट्रेट होर्मुझमधून केला प्रवास

नवी दिल्ली - शिवालिक, नंदादेवीनंतर आता 'जग लाडकी' जहाजही भारतीय किनारपट्टीवर पोहचले आहे. स्ट्रेट होर्मुझ या धोकादायक सामुद्रधुनीतून प्रवास करत हे जहाज कच्चे तेल घेऊन गुजरातच्या मुंद्रा पोर्टला दाखल झाले आहे. आज सकाळी १०.३० वाजता मुंद्रा पोर्टच्या बाह्य सागरी क्षेत्र SPM येथे जग लाडकी जहाज पोहचले. हे खोल समुद्रातील ठिकाण असून तिथून मोठ्या जहाजातून तेल बाहेर काढले जाते. टँकर त्याच्या नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर येथे तैनात असलेल्या तांत्रिक पथकांनी त्यांची सुरक्षा तपासणी पूर्ण केली. यानंतर नियमानुसार समुद्रातील हस्तांतरण पार पाडण्यात आले.

भारत सरकारच्या शिपिंग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राजेश कुमार सिन्हा म्हणाले की, भारतीय तिरंगा ध्वज असलेले जग लाडकी जहाज १४ मार्चला संयुक्त अरब अमीरात येथून निघाले होते. या जहाजातून जवळपास ८१ हजार मुरबन कच्चे तेल भारतात आणले गेले. याआधी भारतीय ध्वज असणारे एलपीजी जहाज शिवालिक, नंदादेवी हेदेखील स्ट्रेट होर्मुझमधून प्रवास करत भारतात पोहचले आहेत. शिवालिक १६ मार्च रोजी गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल झाले. नंदादेवी जहाज १७ मार्च रोजी कांडला पोर्टवर पोहचले. या दोन जहाजातून जवळपास ९२ हजार ७१२ टन एलपीजी भारतात पोहचले आहे. 

शिवालिक, नंदादेवी आणि जग लाडकी ही जहाजे त्या २२ जहाजांमधील आहेत जे युद्ध काळात स्ट्रेट होर्मुझ बंद झाल्याने पश्चिमी भागात अडकली होती. अमेरिका, इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला. त्यानंतर मध्य पूर्वेत तणावाची स्थिती निर्माण झाली. इराणने या हल्ल्यानंतर स्ट्रेट होर्मुझमधील सागरी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे अनेक तेल वाहतूक करणारी जहाजे अडकली. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेल, इंधन तुटवडा निर्माण झाला. ट्रम्प यांनी अनेक देशांना स्ट्रेट होर्मुझमधून सुरक्षित बाहेर काढू असं आश्वासित केले परंतु त्यांना यश आले नाही. दुसरीकडे भारताला इराणशी चांगल्या संबंधांचा फायदा झाला. अनेक भारतीय जहाजे सुरक्षितपणे या सागरी मार्गातून भारतात परतली आहेत. 

दरम्यान, एकूण २२ भारतीय ध्वजधारक जहाजे स्ट्रेट होर्मुझमध्ये अडकली असून त्यापैकी ६ LPG कॅरियर्स, १ LNG टँकर, ४ क्रूड ऑइल टँकर्स आणि केमिकल कंटेनर जहाजांचाही समावेश आहे. यातील एका मोठ्या LPG जहाजामध्ये सुमारे ४५००० मेट्रिक टन गॅस वाहून नेला जाऊ शकते. त्यामुळे ६ जहाजांमध्ये मिळून अंदाजे  ३ लाख मेट्रिक टन LPG आहे. दोन भारतीय LPG टँकर्स ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ यांनी सुरक्षितपणे होर्मुझ पार करत भारतात पोहचले आहे. त्यानंतर आता जग लाडकी हे तिसरे जहाजही भारतात दाखल झाले आहे. 

Web Title : शिवालिक और नंदादेवी के बाद 'जग लाडकी' जहाज भारत पहुंचा

Web Summary : शिवालिक और नंदादेवी के बाद, 'जग लाडकी' कच्चे तेल के साथ होर्मुज जलडमरूमध्य के माध्यम से भारत पहुंचा। जहाज में 81,000 टन कच्चा तेल था। तनाव के बीच, भारत सुरक्षित मार्ग के लिए ईरान के साथ मजबूत संबंधों का लाभ उठाता है।

Web Title : After Shivalik and Nandadevi, 'Jag Ladki' Ship Reaches India

Web Summary : Following Shivalik and Nandadevi, 'Jag Ladki' reached India with crude oil via the Strait of Hormuz. The ship carried 81,000 tons of crude oil. Amidst tensions, India leverages strong Iran ties for safe passage.