शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

IPS: आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 07:40 IST

IPS Officers Promotion New Rules: भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता २०११ च्या बॅचपासूनच्या सर्व अधिकाऱ्यांना केंद्रात पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर काम करणे बंधनकारक असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून २०११ च्या बॅचपासून पुढच्या सर्व आयपीएस अधिकाऱ्यांना आता केंद्रात पोलिस महानिरीक्षक (आयजी) पदावर नियुक्ती मिळविण्यासाठी किमान दोन वर्षे केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, २०११ आणि त्यानंतरच्या बॅचच्या अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक (एसपी) किंवा पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) या स्तरांवर केंद्रीय पोलिस दलांत किमान दोन वर्षाचा अनुभव घेणे बंधनकारक आहे. हा अनुभव गाठीशी असल्याशिवाय त्यांना केंद्रीय सेवेत 'आयजी' किंवा त्या समकक्ष पदावर पदोन्नती मिळणार नाही.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय स्तरावरील कामाचा पुरेसा अनुभव मिळावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. आयएएस अधिकाऱ्यांसाठी अशा प्रकारचा नियम आधीपासूनच लागू आहे. या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) आणि इतर केंद्रीय पोलिस संस्थांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासही मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यांतील अनेक तरुण अधिकाऱ्यांना दिल्लीत जाऊन आपली सेवा देणे भाग पडणार आहे. सूत्रांनी सांगितले की, अशा प्रकारचा केंद्रीय अनुभव अधिकाऱ्यांच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मोलाचा ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Central Government Mandates Central Deputation for IPS Officers' Promotion

Web Summary : To promote IPS officers, the central government now requires a minimum two-year central deputation for IG-level postings. This rule, effective from the 2011 batch, aims to enhance experience in central police forces, addressing officer shortages and improving strategic decision-making at the national level.
टॅग्स :PoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार