गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:16 IST2025-08-14T15:16:23+5:302025-08-14T15:16:52+5:30
IPS Ajay Kumar Sahni: एन्काउंटर स्पेशालिस्ट अजय कुमार साहनी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार
IPS Ajay Kumar Sahni: उत्तर प्रदेशातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजय कुमार साहनी यांना त्यांच्या शौर्यासाठी यावर्षी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना यापूर्वी दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हे तिसरे राष्ट्रपती पदक आहे. उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी साहनी हे यूपी पोलिसात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात.
गुन्हेगारांचे कर्दनकाळ ५२ एन्काउंटर
आयपीएस अजय कुमार साहनी बरेली जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये एसएसपी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ५२ गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे, ज्यात अनेक कुख्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे. त्यांना राज्यातील एक कुशाग्र पोलिस अधिकारी म्हणूनही ओळखले जाते.
UPSC कधी उत्तीर्ण झाले?
अजय कुमार यांनी २००८ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलिस सेवेसाठी निवड झाली. ते मूळचे उत्तर प्रदेशातील महारागंज जिल्ह्यातील आहेत. सध्या ते बरेलीमध्ये डीआयजी पदावर तैनात आहेत. यूपी पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांनी अर्थशास्त्रात एमए पदवी मिळवली आहे.
त्यांनी आतापर्यंत सिद्धार्थनगर, बिजनौर, आझमगड, अलीगढ आणि बाराबंकीमध्ये एसएसपी म्हणून काम पाहिले आहे. २०२१ मध्ये एका प्रतिष्ठित मासिकाने त्यांच्या सर्वेक्षणात देशातील टॉप ५० आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये साहनी यांचा समावेश केला होता. मे २०२५ मध्ये त्यांना बरेली रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्त करण्यात आले.