आयपीएल बेटिंगमध्ये ‘त्याने’ गमावली पत्नी!

By Admin | Updated: May 29, 2016 00:49 IST2016-05-29T00:49:52+5:302016-05-29T00:49:52+5:30

महाभारतात पांडवांनी द्युताच्या जुगारात पणाला लावून द्रौपदीला गमावले तसेच येथील गोविंदनगर भागातील एका महाभागाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेवरील बेटिंगमध्ये पत्नी

IPL betting 'lost' wife! | आयपीएल बेटिंगमध्ये ‘त्याने’ गमावली पत्नी!

आयपीएल बेटिंगमध्ये ‘त्याने’ गमावली पत्नी!

कानपूर : महाभारतात पांडवांनी द्युताच्या जुगारात पणाला लावून द्रौपदीला गमावले तसेच येथील गोविंदनगर भागातील एका महाभागाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेवरील बेटिंगमध्ये पत्नी पणाला लावून तिला गमावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बेटिंगमधील सहजुगाऱ्यांनी या हारलेल्या व्यक्तीच्या घरी एकसारख्या चकरा मारून सतावण्यास सुरुवात केल्यावर ‘पैज’ म्हणून लावलेल्या त्याच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी या जुगारी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तो फरार आहे. गोविंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय प्रकाश श्रीवास्तव यांनी सांगितले की,
पाच वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून पतीच्या जुगार आणि दारुच्या व्यसनाने ही फिर्यादी महिला अगदी हैराण झाली आहे. शेअर बाजारात पैसे लावून कफल्लक झाल्यावर अलिकडेच त्याने आयपीएल सामन्यांवरील बेटिंगमध्ये चक्क पत्नीला पणाला लावले. (वृत्तसंस्था)

Web Title: IPL betting 'lost' wife!