शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

तोंड बंद करण्याऐवजी मलाच अ‍ॅम्बेसॅडर नेमा!

By admin | Updated: January 24, 2017 01:01 IST

‘कोणी पैसे दिले तर ते अवश्य घ्या, पण मतदान आम्हाला करा’ या गोव्यातील प्रचारसभेत केलेल्या विधानाबद्दल आपली निर्भत्सना

नवी दिल्ली : ‘कोणी पैसे दिले तर ते अवश्य घ्या, पण मतदान आम्हाला करा’ या गोव्यातील प्रचारसभेत केलेल्या विधानाबद्दल आपली निर्भत्सना करून यापुढे पुन्हा असे विधान केले तर माझ्या पक्षाची मान्यताही काढून घेण्याचा विचार केला जाईल, हा आदेश मागे घ्यावा. एवढेच नव्हे तर निवडणुकीतील धनशक्तीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी उलट तुम्हीच मला तुमचा अ‍ॅम्बॅसॅडर नेमा, असे रोखठोक पत्र दिल्लीच मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगास लिहिले आहे.गोव्यातील विधानाबद्दल कडक शब्दांत समज दिल्याबद्दल केजरीवाल यांनी आधी प्रचारसभांमध्ये व माध्यमांमधून आयोगावर सडकून टीका केली होती. आता तोच बंडखोरीचा सूर कायम ठेवून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी हे पत्र लिहिले आहे.केजरीवाल लिहितात, काहीही चुकीचे बोललेलो नाही. जे पैसे देतील त्यांना मत द्या, असे मतदारांना सांगितले असते तर तो भ्रष्टाचार ठरला असता. पण मी नेमके याच्या उलट म्हणजे जे पैसे देतील त्यांना मत देऊ नका, असे सांगत आहे. खरे तर माझ्या या विधानाने मतदारांना पैसे वाटणे बंद होईल. कारण लोक पैसे घेऊनही आपल्याला मते देत नाहीत, असे दिसल्यावर राजकीय पक्ष आपणहूनच मतदारांना पैसे वाटणे बंद करतील.दिल्लीच्या निवडणुकीत आमच्या पक्षाने हेच करून दाखविले. आमच्या अशा प्रचारामुळे लोकांनी काँग्रेस व भाजपाकडून पैसे घेतले व मते आम्हाला दिली, असा दावा करून केजरीवाल झैदी यांना म्हणतात की, खरे तर ‘पैसे देणाऱ्यांना मते देऊ नका’ हे निवडणूक आयोगाने घोषवाक्य म्हणून स्वीकारून त्याच्या प्रचारासाठी माझी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ म्हणून नेमणूक करायला हवी! केजरीवाल पत्रात म्हणतात की, निवडणुकांमधील पैशाचा वापर बंद व्हावा यासाठी निवडणूक आयोग गेली ७० वर्षे प्रयत्न करीत आहे. पण त्याचा उपयोग न होता उलट धनशक्तीचा प्रभाव वाढत चालला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)