शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

स्थलांतरित परतलेल्या राज्यांपैकी सहा राज्यांत संसर्ग वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:08 AM

रुग्णसंख्येत झाली वाढ : उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसामचा समावेश

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात काम करीत असलेले कामगार आपापल्या राज्यात परतल्यानंतर, यापैकी ६ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले आहे. १५ दिवसांतील रुग्णसंख्येचा अभ्यास केल्यानंतर, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार परतलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.या ६ राज्यांमध्ये १ मेपासून रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण ८.२ पटीने जास्त आहे. उर्वरित राज्यांमध्ये हे प्रमाण ७ पट इतके आहे. स्थलांतरित कामगार आपल्या मूळगावी परतल्यानंतरच या ६ राज्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढला.

गत ३ आठवड्यांपासून ६ राज्यांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्याचे दिसते. यापैकी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि झारखंड या ४ राज्यांत नवे रुग्ण आढळण्याचे साप्ताहिक प्रमाण आजवर सर्वाधिक आहे. या तुलनेत बिहार आणि ओडिशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण थोडे कमी आहे, असे आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)च्८ जून या दिवशीची रुग्णसंख्या लक्षात घेता, देशातील एकूण रुग्णांपैकी १२ टक्के रुग्ण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील आहेत. १ मे रोजी हे प्रमाण १०.५ टक्के होते.च्याशिवाय १ ते ७ मे या काळात देशात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी८ टक्के रुग्ण या ६ राज्यांतून होते. २ ते ८ जून या आठवड्यात हे प्रमाण दुप्पट म्हणजे १६ टक्के इतके झाले आहे.टेस्टच्या प्रमाणात वाढच्६ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्यामागे टेस्टची वाढलेली संख्या कारणीभूत असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र, याच काळात संपूर्ण देशभर टेस्ट आणि रुग्णांची संख्या वाढल्याने हा मुद्दा गैरलागू ठरतो. 

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार