केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. तर या क्रमवारीत गुजरातमधील सूरत हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.
स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये विविध वर्गवारीनुसार स्वच्छ शहरांची घोषणा करण्यात आली. यात इंदूर, सूरत आणि नवी मुंबई या शहरांनी बाजी मारली. त्याशिवाय तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा या शहराने पहिला क्रमांक पटकावला. या गटामध्ये चंडीगड दुसऱ्या आणि म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विजेत्यांना स्वच्छता सर्व्हेक्षण २०२४-२५ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान केले. यावेळी केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.