VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:35 IST2025-12-06T13:30:15+5:302025-12-06T13:35:32+5:30
IndiGo flights cancelled, Travellers angry crying: विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्या, तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले.

VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
IndiGo flights cancelled, Travellers angry crying: इंडिगोविमानसेवेचा सावळा गोंधळ अद्यापही सुरुच आहे. इंडिगोच्या गचाळ व्यवस्थापनाने गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रस्त करून सोडले आहे. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी, निराशा आणि संतापाचे चित्र आहे. विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले. एका विदेशी महिलेचा राग इतका वाढला की तिने थेट विमान कंपनीच्या काउंटरवर धाव घेतली आणि तिच्या विमान रद्द करण्याबाबत जाब विचारला.
विदेशी महिलेचा काउंटरवर चढून आक्रोश
एक विदेशी महिला काउंटरची खिडकी पकडून अनवाणी पायांनी ती थेट काउंटरवर चढली. तिने तेथून ओरडून होणाऱ्या गैरसोयीबाबत आक्रोश केला आणि विमान कंपनीकडे जाब विचारला. काउंटरवरील ग्राउंड स्टाफने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. महिलेने ओरडून सांगितले की तिचे सर्व सामान तिच्या बॅगेत भरलेले होते. तिच्याकडे घालण्यासाठी अतिरिक्त कपडे नव्हते. तिने इतर त्रस्त प्रवाशांकडून आधारही मागितला. विमान कंपनीकडून मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत. अडकून पडल्यामुळे संतप्त महिलेने अन्न-पाण्याचीही मागणी केली. पण तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
काहींना भावना अनावर, रडूही कोसळलं
शनिवारी एकूण ४५२ इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये हैदराबादला जाणारी ६९, दिल्लीला जाणारी १०६, मुंबईला जाणारी १०९, चेन्नईला जाणारी ४८, अहमदाबादला जाणारी १९, हैदराबादला जाणारी ६९, जयपूरला जाणारी ६, चंदीगडला जाणारी १० आणि विशाखापट्टणमला जाणारी २० उड्डाणे समाविष्ट आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते, शनिवारी मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत एकट्या अहमदाबाद विमानतळावर येणारी सात आणि जाणारी बारा उड्डाणे रद्द करण्यात आली. सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांच्या लांब रांगा, गर्दीच्या काउंटर आणि पर्यायी प्रवास पर्यायांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये निराशा वाढली. शनिवारी सकाळी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरही मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. लांब रांगा आणि वारंवार रद्द झालेली उड्डाणे यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एका तरुणीला अश्रू अनावर झाले.
#WATCH | Gujarat: A passenger weeps at Sardar Vallabhbhai Patel International Airport in Ahmedabad, long queues of passengers seen here as a few IndiGo flights stand cancelled yet again.
— ANI (@ANI) December 6, 2025
The Flight Duty Time Limitations (FDTL) orders of the DGCA have been placed in abeyance with… pic.twitter.com/8qmI72w2uN
इंडिगो पाहतंय प्रवाशांचा अंत
देशभरात इंडिगोला ऑपरेशनल कारणांचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) त्यांचे फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) आदेश तात्काळ स्थगित केल्याने ही समस्या उद्भवली आहे. देशभरात अनेक दिवसांचा विलंब आणि रद्द यानंतर हे नियामक निलंबन आले. याचा परिणाम इंडिगोच्या उड्डाण ऑपरेशन्सवर झाला आहे, ज्यामुळे सर्व क्षेत्रातील प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे.