भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर, बीएसएफने केला गोळीबार; तस्करांना हाकलून लावले; शस्त्रांचा मोठा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:45 IST2026-01-29T16:36:23+5:302026-01-29T16:45:43+5:30

फाजिल्का येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बीएसएफच्या बीओपी जी-जी-३ परिसरात रात्री उशिरा गोंधळ उडाला. पाकिस्तानी तस्कर दोन बॅगांमध्ये पॅक करून शस्त्रे आणि हेरॉइनचा मोठा साठा भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.

India's response to Pakistan, BSF opened fire; Smugglers driven out; Large cache of weapons seized | भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर, बीएसएफने केला गोळीबार; तस्करांना हाकलून लावले; शस्त्रांचा मोठा साठा जप्त

भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर, बीएसएफने केला गोळीबार; तस्करांना हाकलून लावले; शस्त्रांचा मोठा साठा जप्त

पंजाबमधील फाजिल्का येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेला शस्त्रास्त्रे आणि हेरॉइनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा बीएसएफच्या बीओपी जी-जी-३ परिसरात पाकिस्तानी तस्कर या खेपेस सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. वेळीच सतर्क असलेल्या बीएसएफ जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. 

बीएसएफ जवानांनी तस्करांवर ६० राउंड गोळीबार केला. यानंतर तस्कर फरार झाले. यानंतर बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या राज्य विशेष ऑपरेशन सेलने संयुक्तपणे परिसरात शोध मोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान, पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेला शस्त्रास्त्रे आणि हेरॉइनचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ही माहिती पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दिली.

फाजिल्का येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बीएसएफच्या बीओपी जी-जी-३ परिसरात रात्री उशिरा गोंधळ उडाला. पाकिस्तानी तस्कर दोन बॅगांमध्ये पॅक करून शस्त्रे आणि हेरॉइनचा मोठा साठा भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने बीएसएफच्या जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले.

मोठी बातमी: UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सरन्यायाधीश म्हणाले, होऊ शकतो दुरुपयोग  

बीएसफने गोळीबार केला, त्यानंतर तस्करांनी अंधाराचा फायदा घेत पाकिस्तानात पळ काढला. झडती दरम्यान, पाकिस्तानातून पाठवण्यात आलेली शस्त्रे आणि हेरॉइनचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी २ किलो १६० ग्रॅम हेरॉइन, ११ ग्लॉक पिस्तूल आणि २२ मॅगझिन, १ बेरेटा पिस्तूल आणि १ मॅगझिन, ५ झिगाना पिस्तूल आणि १० मॅगझिन, ३ नोरिंको पिस्तूल आणि ५ मॅगझिन, १ गफ्फर सिक्युरिटी पिस्तूल आणि १ मॅगझिन - एकूण २० पिस्तूल, ३९ मॅगझिन, एक बंदूक आणि ३१० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. राज्य विशेष कक्षाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

अमृतसरमधील एका सीमावर्ती गावात चार हातबॉम्ब आणि ४० किलो हेरॉइन जप्त

दरम्यान, अमृतसरच्या राजासांसी मतदारसंघातील ओथियान गावाजवळ पोलिसांनी चार हातबॉम्ब आणि ४० किलो हेरॉइन जप्त केले. ही खेप पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठवण्यात आली होती. एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली. ही खेप ओथियान गावाजवळ आली आणि काही तरुण मोटारसायकलवरून ती घेऊन जात होते. त्यावेळी गावात रस्ता बांधण्याचे काम सुरू होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि कामगारांनी तरुणांना रोखले तेव्हा ते घाबरले आणि मोटारसायकल सोडून पळून गेले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोटारसायकलसह आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. 

Web Title: India's response to Pakistan, BSF opened fire; Smugglers driven out; Large cache of weapons seized